दुसऱ्यावर टीका करून आपला प्रचार करण्यापेक्षा कोल्हापूरचा शाश्वत विकास कसा करता येईल यावर आमचा भर : संभाजीराजे छत्रपती ( चंदगड तालुका प्रचार दौऱ्यात जनतेचा प्रचंड प्रतिसाद )
चंदगड :
काही लोक दुसऱ्यावर टिका करून मोठे होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. छत्रपती घराणे अव्याहत जनसेवेसाठी कार्यरत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आपण चंदगडचा विकास करण्यास कटिबद्ध आहोत. महाराज आपल्या हक्काचे आहेत. कधीही आपण महाराजांकडे या, महाराज आपल्याला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत, हा विश्वास मी आपल्याला देतो, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांचा जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय दौरा सुरू असून आज ते चंदगड मधील अडकूर जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर असताना विंझणे या गावात बोलत होते. या दौऱ्यात संभाजीराजे यांनी अडकूर, मलगेवाडी, बोंजूर्डी, मोरेवाडी, उत्साळी, आमरोळी, पोरेवाडी, सोनारवाडी, मुगळी, केचेवाडी, आसगोळी, केरवडे, वाळकुळी, सातवणे, सावर्डे, शिरगांव, नागनवाडी, कोरज, कुर्तनवाडी, बेळेभाट, दाटे या गावांचा दौरा केला.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, चंदगड आणि कोल्हापूर शहर यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली पाहीजे यासाठी विशेष प्रयत्न आपण करणार आहोत. चंदगड निसर्गसंपन्न आहे, काजू उत्पादनाचे आगार असलेल्या या भागात मोठे प्रकल्प आणणे गरजेचे आहे.
प्रचार दौऱ्याप्रसंगी संजय पोवार, विष्णू जोशिलकर, विशाल पाटील, बंटी देसाई, शिवाजीराव सावंत, तातोबा गावडे, विंझणे गावचे सरपंच तानाजी पोवार, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.