कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे येथील पूर ओसरला : पाणी रस्त्यावरून खाली गेले : वाहतूक सुरू झाली
करवीर २७ :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यावर असणारे पुराचे पाणी आज ओसरले आहे, पुराचे पाणी रस्त्यावरुन खाली गेले असून पाणी काठापर्यंत आहे, यामुळे वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
गेली पाच दिवस भोगावती नदीला पूर आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. रात्री आठच्या दरम्यान दीड फूट पुराचे पाणी रस्त्यावर होते.
पावसाने उसंत दिल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावरून जाऊन रस्त्याच्या काटा बरोबर पाणी सध्या राहिले आहे. यामुळे वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू व्हावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात आहे.