परिते जिल्हा परिषद मतदारसंघातील गावात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याना मंजूर पत्राचे वाटप
करवीर :
आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील , जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरची संजय गांधी निराधार समिती कार्यरत असून करवीर विधानसभा मतदारसंघातील पात्र लाभार्त्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात येत आहे. करवीर तालुक्यातील परिते जिल्हा परिषद मतदारसंघातील गावात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याना मंजूर पत्राचे वाटप मंजूर पत्र देण्यात आले.
याप्रसंगी संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदीप पाटील (कुर्डूकर) म्हणाले, शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यत पोहचविणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन समिती कार्य करत आहे. करवीर मतदारसंघाचे आमदार पी.एन.पाटील यांच्या प्रयत्नातून अंध, अपंग, विधवा, परितक्त्या अशा हून अधिक जणांना संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतून लाभ मिळवून दिला आहे. समितीच्या कार्यात सर्व सदस्यांचे सहकार्य व योगदान मिळत आहे.
मंजूर पत्र वाटपप्रसंगी संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदिप पाटील, पंचायत समिती सदस्या अश्विनी धोत्रे, भोगावतीचे संचालक शिवाजीराव कारंडे ,कृष्णात धोत्रे, स्वरूप पाटील यांच्यासह गावागावातील
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व गावातील प्रमुख ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.