करवीर : २९
श्री यशवंत सहकारी बँक कुडित्रे यांनी फास्टॅग सेवा सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.अशी माहिती अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक नागरिकांसाठी ही महत्त्वाची सेवा असून रोख पैशाचा व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅग चा वापर होईल.
प्रचलित पद्धतीने टोल भरता येत असला तरी शासनाच्या नवीन नियमानुसार टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य असून फास्टॅग असणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही, टोलची रक्कम फास्टॅगशी जोडलेल्या बँक अकाउंट मधून कपात होईल तरी बँक ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधावा, फास्टॅग सेवेचा वापर करावा.
आजच्या आधुनिक युगात बँक ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्याच्या पुरविण्यात बँकेचे एक पाऊल पुढे आहे. येत्या काही कालावधीमध्ये बँक ग्राहकांना मोबाईल बँकिंग तसेच यु .पी. आय ,(फोन पे, गूगल पे ) ई सेवा देण्याचा बँकेचा मानस आहे.यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, सर्व संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.