कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य यंत्रणेमार्फत कोव्हीड -19 आजाराशी संबंधित कार्यरत असणाऱ्या / आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संबंधिताना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी प्रमाणपत्र संबंधित आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेऊन व जिल्हाधिकारी यांचेकडून प्रमाणित करून घेऊन संचालक, आरोग्य सेवा यांना सादर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी पारित केले आहेत.

केंद्र शासनाकडून कोव्हीड -19 आजाराशी संबंधित रुग्णावर उपचार, तपासणी करणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पॅकेज अंतर्गत 50 लाख रु इतक्या रक्कमेचे विमा कवच अनुज्ञेय करणेत आलेले आहे. विमा संरक्षण हे कोव्हीड बाधेवर तपासणी व उपचार करणाऱ्या सर्व संबंधिताना अनुज्ञेय आहे. यामध्ये खाजगी रुग्णालयांच्या कर्मचारी / सेवानिवृत्त कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी / रोजंदारीवरील कर्मचारी / बाहय यंत्रणेव्दारे उपलब्ध करून घेतलेले कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी, केंद्र / राज्य/ स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व प्रकारची रुग्णालये येथे कार्यरत कर्मचारी / रुग्णालयाच्या सेवा शासनाकडून कोव्हीड सेवेसाठी अधिग्रहित केले असल्यास तसेच खाजगी रुग्णालय कोव्हीड उपचारासाठी नोंदणीकृत केले असल्यास या ठिकाणी कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सर्व संवर्गांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत विमा संरक्षण लागू आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा योजना 30 मार्च 2020 रोजी लागू झाली असून सदरील विमा योजनेस दिनांक 24 मार्च 2021 पासून अतिरिक्त 180 दिवसांची तृतीय मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोव्हीड -19 आजाराशी संबंधित कार्यरत असणाऱ्या / आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संबंधिताना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत सादर करण्यात येणारे अर्ज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विमा अर्जाची पात्रता निश्चित करून विहित नमुन्यामध्ये प्रमाणित करून सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य यंत्रणेमार्फत कोव्हीड -19 आजाराशी संबंधित कार्यरत असणाऱ्या / आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संबंधिताना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी प्रमाणपत्र संबंधित आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेऊन व जिल्हाधिकारी यांचेकडून प्रमाणित करून घेऊन संचालक, आरोग्य सेवा यांना सादर करण्यासाठी खालील नमूद अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती या आदेशाव्दारे करण्यात आली आहे.
अ.क्र. अधिकारी यांचे नांव व पदनाम सहाय्यक कर्मचारी यांचे नांव व पदनाम
1 श्रीमती अर्चना कापसे,
तहसिलदार सर्वसाधारण
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर श्री राजन नाळे, अ.का., कार्या.14/ लेखा
श्रीमती माया कुंभार, महसूल सहा. कार्या.14/लेखा
वरीलप्रमाणे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावयाचे आहे.
1) जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका, व कोल्हापूर जिल्हा समन्वयक, PMJAY योजना यांचे मार्फत कोव्हीड -19 आजाराशी संबंधित कार्यरत असणाऱ्या / आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी / अधिकारी यांचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत येणारे विमा अर्ज व विहित नमुन्यातील प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.
2) प्राप्त होणारे विमा अर्ज व विहित नमुन्यामधील प्रमाणपत्र तपासून जिल्हाधिकारी यांचेकडे स्वाक्षरीस्तव सादर करणे.
3) मान्यतेअंती सदरचे प्रस्ताव मा. संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांना पुढील कार्यवाहीस्तव सादर करणे.
4) प्राप्त प्रस्तावाबाबत स्वंतत्र नोंद वही ठेवून अद्यावत करणे.
आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील.