वडणगे येथून गवा करवीर पश्चिम परिसरात आला
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर
गवा रात्री बालिंगे येथे होता,नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ कमी होताच स्मशान शेड येथून गवा पाडळी खुर्दच्या शिवारात गेला आहे.
गेल्या दहा दिवसापूर्वी हा गवा याच पाडळी खुर्दच्या येथून लक्ष तीर्थ मध्ये आणि वडणगे भागात गेला होता, वनखाते, आणि रेस्क्यू टीम ने त्यावर लक्ष ठेऊन पुढे हुसकवत ठेवले, रात्री हा गवा बालिंगा येथे होता,नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ कमी होताच साडेदहा वाजता स्मशान शेड येथून गवा पाडळी खुर्दच्या शिवारात गेला आहे.
यामार्गे हा गवा आता बीड येथून डोंगरात आदिवासात जाऊ शकतो,मात्र बालिंगा,
पाडळी खुर्द,कोगे,महे,बीड आणि वाड्या वस्त्या येथे नागरिकांनी सतर्क राहून शेतीची कामे करावी लागतील .