करवीर :
हळदी येथे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जोरदांर निदर्शने करण्यात आली.यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य व राजीवजी सुतगिरणीचे चेअरमन मा.राहुल पी.पाटील सडोलीकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
या निदर्शन प्रसंगी भोगावती साखर कारखान्याचे संचालक विश्वनाथ पाटील,प्रा.सुनिल खराडे,शिवाजी कारंडे,धिरज डोंगळे,रविद्र पाटील,जयवंतराव कांबळे,बी.ए.पाटील, शिवाजीराव तळेकर दत्ता मुळीक, चेतन पाटील, कृष्णात धोत्रे ,विजय भोसले, एकनाथ भोसले ,भोगावती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील हळदीकर दिगंबर मेडशिंगे, युवक काँग्रेसचे लखन भोगम ,प्रभाकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.