मागील ६ दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ : जाणून घ्या आजचा दर
Tim Global :
देशभरात इंधनाचा भडका सुरूच आहे. मागील ६ दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
रविवारी (२७ मार्च) पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी वाढले. त्यामुळे सहा दिवसात ३ रुपये ७५ पैशांपर्यंत ही इंधन दरवाढ झाली आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसून त्यांचं आर्थिक गणित कोलमडताना दिसत आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर ११३ रुपये ३५ पैशांवरून ११३ रुपये ८५ पैसे झाले आहेत. डिझेलचे दरही ९७ रुपये ५५ पैशांवरून ९८ रुपये १० पैसे झालेत. दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैशांवरून ९९ रुपये ११ पैसे झाले, तर डिझेल ८९ रुपये ८७ पैशांवरून ९० रुपये ४२ पैशांवर गेले. देशभरात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगळे आहेत. संबंधित राज्यांच्या स्थानिक कर आकारणीतील फरकामुळे या दरांमध्ये काहिशी तफावत दिसते.