शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला : राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार
मुंबई :
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला, मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आज(सोमवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.
दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.” असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
·
Follow
LIVE | Media interaction in #Mumbai
Devendra Fadnavis
LIVE | Media interaction in #Mumbai
5:58 PM · Sep 26, 2022
याचबरोबर “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे. अजून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल.” अशीही माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
या अगोदर राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली होती.
“राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” असं त्यावेळी सांगितलं होतं.