पायी दिंडी सोहळ्याने शिरोली दुमाला येथे अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
करवीर :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे सालाबादप्रमाणे श्री हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक २१/०४/२०२२ ते बुधवार दिनांक २७/०४/२०२२ अखेर श्री गुरवर्य ह.भ.प.श्री.वै विवेकानंद वासकर महाराज व गुरुवर्य ह.भ.प.श्री.वै.तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले असून यानिमित्ताने आज सकाळी गावातून पायी दिंडीने अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरवात करण्यात आली.या पायी दिंडीचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांच्या हस्ते व गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

या दिंडी सोहळ्यात वीरशैव बँकचे संचालक अनिल सोलापूरे, माजी सरपंच नंदकुमार पाटील, माजी सरपंच एस.के.पाटील, उपसरपंच सचिन पाटील, राहुल पाटील, सरदार पाटील, महादेव पाटील, माधव पाटील यांच्या सह केंद्र शाळा शिरोली दु., एकनाथ विद्यालय शिरोली दु., छत्रपती शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कुल व कै.बा.पुं. पाटील हायस्कूल शिरोली दु. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, गावातील महिला, भागातील वारकरी संप्रदायाचे वारकरी व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या सप्ताहानिमित्त नित्याचे ज्ञानेश्वरी पारायण,नाठाचे भजन व हरिपाठ व प्रसिद्ध प्रवचनकाराचे प्रवचन व कीर्तनकाराचे कीर्तन होणार आहेत. व बुधवार (दि.२७).रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी पंचक्रोशीत भाविकांनी सदर सप्ताहमध्ये श्रवनाचा व ज्ञानेश्वरी वाचनाचा लाभ घ्यावा असे अहवान श्री हनुमान भजनी मंडळ शिरोली दु. यांच्या वतीने करण्यात आले आहे .