करवीर :

करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या माध्यमातून गट ब योजनेतून मंजूर झालेल्या १५ लाख खर्चाच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ परिषद सदस्य युवा नेते राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जि.प.सदस्य राहुल पाटील यांचा व करवीर पंचायत समितीच्या नूतन उपसभापती पदी निवड झालेबद्दल अविनाश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राहुल पाटील यांच्या हस्ते पाटेकरवाडी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच सचिन पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुतीराव पाटील, माजी सभापती व राजीवजी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील, राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, माजी उपसभापती व विद्यमान पं.स.सदस्य विजयराव भोसले, सदस्या सविता राजाराम पाटील, राजाराम पाटील, विष्णू पाटील, विष्णू नागोजी पाटील, सरपंच सुनीता बाजीराव पाटील, उपसरपंच सचिन मारुती पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, काँट्रॅक्टर विकास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. निवृत्ती पाटील यांनी स्वागत केले. विष्णू पाटील यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!