करवीर पंचायत समिती सदस्यांच्या पवित्रा
करवीर :
आपले सरकार सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून महिन्याला १२ हजार रुपये घेतले जातात, मात्र डाटा ऑपरेटर यांचा १० महिने पगार दिला जात नाही, कॉम्प्युटर वेळेवर दुरुस्त होत नाही, सेवा वेळेवर मिळत नाही, केंद्राचा कारभार चुकीचा आहे.यामुळे यापुढे करवीर तालुक्यातील ग्रामपंचायती आपले सेवा केंद्रासाठी पैसे भरणार नाहीत, अशी भूमिका पंचायत समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सभापती सुनील पोवार होते. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते.
सदस्य,प्रदीप झांबरे,व सागर पाटील यांनी आपले सेवा केंद्रावरील डाटा ऑपरेटर यांना ग्रामपंचायतीने पगार द्यावा, व सेवा केंद्राकडे पैसे भरू नयेत असा मुद्दा मांडला.
सदस्य प्रदीप झांबरे यांनी अपंग व्यक्तींचे साहित्य का वाटप केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी हसूर येथील दिव्यांग व्यक्ती रंगराव पाटील त्यांनी थेट सभागृहात गेली सहा महिने मी पंचायत समितीला फेऱ्या मारतो, मला व्हीलचेअर सायकल मिळाली नाही अशी तक्रार मांडली.
माजी सभापती व सदस्य अश्विनी धोत्रे यांनी आपल्या गावात एक शिक्षक रजेवर ही नाहीत, आणि शाळेत ही नाहीत,असे चित्र असल्याचे सांगितले, यावेळी प्रदीप झांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत पंचायत समिती सदस्य यांची मुले किती आहेत.सदस्यांची मुले खाजगी शाळेत ,आणि गोरगरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्याचे सांगितले.
पन्हाळा तालुक्यातील आशांचा पगार नोव्हेंबरपर्यंत झाला.करवीर तालुक्यातील पगार तीन महिने का दिला नाही, आरोग्य उपकेंद्र येथे ओपीडी सुरू झाली आहे, मात्र ओपीडी चे बोर्ड लावले नाहीत, असा प्रश्न सागर पाटील यांनी उपस्थित केला.शासनाने जत्रा उत्सव यासाठी धोरण जाहीर करावे, अशी मागणी इंद्रजीत पाटील यांनी केली. दोनवडे, आडुर, येथील राष्ट्रीय पेयजल योजना रखडल्या असून, तालुक्यातील रखडलेल्या योजनांना निधी मिळावा अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. यावेळी चर्चेत सदस्य विजय भोसले,अविनाश पाटील,मोहन पाटील यांनी भाग घेतला.