शेतकऱ्यांना दिलासा

करवीर :

काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या  दगडी पिचिंगचे काम  नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती  मृद व जलसंधारण मंत्री  नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली .करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी एन पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता .   

काटेभोगाव गावापासून नदीचे पात्र खूप अंतरावर आहे .यामुळे सिंचनाअभावी कोरडवाहू शेती अडचणीत होती .पावसाळा संपल्यानंतर रब्बी पिके व जनावरांना पाण्याची सोय असावी म्हणून १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून गावाच्या दक्षिणेला पाझर तलाव बांधण्यात आला होता . पण या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणीसाठवण होत नव्हती . हा तलाव मृद व जलसंधारण  विभागाकडे वर्ग केल्याने, डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला . यानंतर  भरावा वरील झाडे काढून साफसफाई करण्यात आली व पाया खुदाई करून कामाला सुरुवात करण्यात आली होती .तलावाच्या दगडी पीचींग चे काम प्रगतीपथावर असतानाच जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे  दगड व मुरूम तलावात घसरले होते.

यामुळे तलावास धोका निर्माण झाला होता.तलावाच्या खाली असणारी शेकडो एकर शेती धोक्यात आली होती .

    विधिमंडळात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या प्रश्नाबाबत खुलासा करताना  सद्यपरिस्थिती अंशतः खरी  असून   अश्मपाटलाचे काम प्रगतिपथावर असताना चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक तलाव क्षेत्रावर अतिवृष्टी झाली .त्यामुळे प्रगतीवर  असलेले दगड व मुरूम पाण्यामध्ये खाली घसरला आहे .  पाणी साठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे काम थांबले होते.त्यामुळे शासनाच्या निधीचा कोणताही अपव्यय झालेला नसून अचानक आलेल्या चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे ही घटना घडली होती .तसेच निविदेमधील काम अद्याप   पूर्ण झालेले नाही .त्यामुळे तलावातील पाणी पातळी कमी झाल्यावर तलावांमध्ये घसरलेला मुरूम व दगड काढून नव्याने दगडी पिचिंगचे  काम चांगल्या प्रकारे करून  घेण्यात येणार असल्याची माहिती सभागृहाला दिली .

आमदार पी एन पाटील यांनी पाझर तलाव बाबत विधिमंडळात आवाज उठवल्याने जलसंधारण मंत्र्यानी तलावाच्या दुरुस्तीच्या बाबत दिलेल्या आश्वासनामुळे काटेभोगावच्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!