शाहू छत्रपती महाराजांचच्या पाठिंब्यासाठी १५ रिक्षा संघटना एकवटल्या 

कोल्हापूर : 

कोल्हापूरचा स्वाभिमान आणि सर्वसामान्य प्रामाणिक, कष्टकरी वर्गाचा आवाज दिल्लीत घुमला पाहिजे, असा आग्रह करीत कोल्हापूर शहर व परिसरातील तब्बल १५ रिक्षा संघटनांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू  छत्रपती  महाराज यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला कोल्हापूर शहर व परिसरातून दिवसागणिक जाहीर पाठिंब्याची मालिका अखंडपणे सुरू आहे. यात  १५ रिक्षा संघटनांही सामिल झाल्या आहेत. न्यू पॅलेस येथे

रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी मालोजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन पाठिंबा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मालोजीराजे यांची भेट घेऊन पाठिंबा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. या १५ संघटनांमध्ये कोल्हापूर जिल्हा बाहनधारक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, कॉमन मॅन वाहतूक संघटना, आम आदमी रिक्षा संघटना, काँग्रेस आय अॅटो रिक्षा संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अॅटो रिक्षा संघटना, कागल शिरोली पॅसेंजर वाहतूक संघटना, गांधीनगर अॅटो रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, गांधीनगर अॅटो रिक्षा संघटना, गोरक्षनाथ पॅसेंजर वाहतूक संघटना, आदर्श रिक्षा संघटना, न्यू करवीर रिक्षा संघटना, करवीर अॅटो रिक्षा संघटना यांचा समावेश आहे. शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर करताना या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 रिक्षा चालक म्हणजे स्टार प्रचारक : 

आपल्या प्रामाणिकपणाच्या अनेक उदाहणांबद्दल राज्यात परिचित असलेल्या कोल्हापुरातील रिक्षाचालकांचा पाठिंबा बहुमोल ठरणार आहे. रिक्षाचालकांचा वावर संपूर्ण शहर, उपनगरे आणि आसपासच्या ग्रामीण भागात  असल्याने ते या निवडणुकीत शाहू छत्रपतींचे स्टारप्रचारक ठरणार आहेत. 

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर, कॉ. सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत भोसले, संजय जाधव, शिवसेनेचे राजेंद्र जाधव, केशव माने, वसंत पाटील, अविनाश दिंडे, संभाजी रणदिवे, श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, शिवाजी पाटील, शंकरलाल पंडित, ईश्वर चन्नी, सुभाष शेटे, अतुल पोवार उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!