अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :
157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा

कोल्हापूर :

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत, आत्तापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 28 कर्ज प्रकरणे बॅंकेमार्फत मंजूर झाली, असून बॅंकांनी लाभार्थ्यांना 157 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे.
त्यातील 1 हजार 719 जणांना महामंडळामार्फत 10 कोटी 60 लाख 6 हजार 678 रुपयांचा व्याज परतावा प्राप्त झाला आहे. महामंडाळाच्या या योजनांचा मराठा समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

महामंडळाच्या अर्थसहाय्यामुळे जिल्ह्यातील तरुण मोठा उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नियमीत कर्जाची परत फेड करणा-यांना नियमीत व्याज परतावा मिळत आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आत्तापर्यंत राज्यातील 23 हजार 140 लाभार्थ्यांना बॅकांनी 1899 कोटी 88 लाख 88 हजार 697 रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. त्यातील 18 हजार 646 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु झाला असून 97 कोटी 61 लाख 70 हजार 147 रुपये व्याज परताव्याची रक्कम देण्यात आली आहे.

आजतागायत एकही कर्ज खाते एन.पी.ए मध्ये गेले नसल्यामुळे व नियमीतत व्याज परतावा मिळत असल्याने प्रारंभी अनुकुल नसणा-या बॅकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या माध्यमातून शहरी ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. महामंडळाच्या योजनेत कर्ज प्रकरणे मंजूर करणा-यांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांसह सहकारी बॅंकेचे मोठे योगदान आहे. लाभार्थ्यांना नियमीत व्याज परतावा सुरु झाल्यामुळे बॅकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील व माजी उपाध्यक्ष संजय पवार यांचे मोठे योगदान आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, अग्रणी जिल्हा बॅंक प्रबंधक राहूल माने, सहायक आयुक्त संजय माळी महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, समन्वयक शुभांगी जाधव, सतीश माने, पुष्पक पालव, ऋषिकेश आंग्रे या सर्वांचे सहकार्य लाभत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!