पुणे :
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यासह
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले असून राज्यातील विविध भागात त्यामुळे शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचेदेखील मोठे नुकसान केले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना पिवळा अलर्ट देण्यात आला आहे.