पुणे :
राज्यात अनेक भागात आज पावसानं (Rainfall) हजेरी लावली. तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. हवामान विभागानं (Weather Department) आज राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केला.
माॅन्सूनचा परतीचा प्रवास मागील सात दिवसांपासून थांबलेला आहे. सध्या माॅन्सूनची सीमा उत्तरकाशी, नजिबाबाद, आग्रा, ग्वालिय, रतलाम, भरूच आणि लाॅंग या भागात आजही कायम होती. तर राज्यात आज अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली.
तर बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा जास्त होता. मात्र या पावसानं खरिपातील काढणीला आलेल्या भाताचं नुकसान वाढलंय.
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये काही वेळ मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा जोर जास्त होता.
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रांमध्ये मध्यम ते जोरदार पावसानं हजेरी लावली. तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पाऊस पडला. धुळे, नंदूरबार आणि जळगावमध्ये काही मंडळांमध्ये पाऊस पडला.
हवामान विभागानं आज राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. कोकणाताली सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर तसचं मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही मंडळांध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.