राज्यातील या भागात पुढचे २ दिवस पावसाचा इशारा

Tim Global :

राज्यातील काही भागात पुढचे २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला असून याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार आहे. चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसणार नाही. परंतु महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

K S Hosalikar
@Hosalikar_KS
22 March;
पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
IMD
12:52 PM · Mar 22, 2022
86
Reply
Copy link

ढगाळ वातावरणाचा शेतीवर जास्त परिणाम दिसून येत आहे. आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी अद्यापही कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्येही ४० अंश कमाल तापमान असल्याने या भागात उन्हाचा चटका कायम आहे. मुंबई परिसरासह कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव भागात कमाल तापमान ४० अंशापुढे आहे. उर्वरित भागात तापमान सरासरीजवळ आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हल्या सरीही बरसल्या आहेत. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात तर २३ ते २५ आणि मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!