अध्यक्ष चंद्रदीप नरके
करवीर :
कासारी सहकारी साखर कारखान्यात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेड, न्यू दिल्ली संस्थेकडून हंगाम २०१९/२० करिता सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
चीप डायरेक्टर (शुगर)भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ञांच्या समितीने कुंभी कासारी कारखान्याची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण २६ मार्च २०२१ रोजी बडोदा, गुजरात येथे होणार आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष नरके म्हणाले यापूर्वी सन १९९१/९२ मध्ये अखिल भारतीय पातळीवरील ऊस विकास कार्याबद्दलचा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि उच्च साखर उतारा विभागातील तृतीय क्रमांकाचे पुरस्कार तसेच सन २०१७/१८ करिता सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली यांच्याकडून मिळालेला आहे.
कारखान्यास सन १९९२/९३,१९९३/९४,२००१/०२,२००४/०५,२०११/१२,२०१४/१५ आणि २०१७/१८ या वर्षासाठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून पुरस्कार मिळाले आहेत.
कारखान्यांने नेहमीच उच्च साखर उतारा ऊस विकास आणि तांत्रिक कार्यक्षमता राखण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुरस्काराचे आयुष्यात कारखाने सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक संघटना, व्यापारी व कंत्राटदार यांच्या बहुमोल असा वाटा असल्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितले. कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.आँफ शुगर फॅक्टरीज, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना लि. मुंबई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले लाभले आहे असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर संचालक बाजीराव शेलार, अनिल पाटील, विलास पाटील, किशोर पाटील, दादासो लाड, उत्तम वरूटे, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, जयंसिंग पाटील, जयसिंग ज्ञानदेव पाटील, पी.डी. पाटील, प्रकाश पाटील,यल्लाप्पा कांबळे, आनंदराव माने, दिलीप गोसावी, भगवान पाटील, आबा पाटील, माधुरी पाटील, अनिता पाटील व कार्यकारी संचालक अशोक पाटील, प्रकाश पाटील इंजिनियर, संजय पाटील, शेती अधिकारी संजय साळवी, आणि कामगार प्रतिनिधी सरदार पाटील व विलास पाटील उपस्थित होते.