करवीर :
कै. दिनकर व शामराव पवार – पाटील बंधू शैक्षणिक, कला,क्रीडा व सांस्कृतिक संस्था सडोली खालसा यांच्या विद्यमाने घानवडे (ता.करवीर) येथील कै. ग.बा. पवार – पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय भाषा तज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ.गणेश देवी यांचे
सद्य राजकीय स्थितीचा ग्रामीण भागातील शैक्षणिक जीवनावरील परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कै. दिनकरराव पवार पाटील (पापा) स्मृतिदिन समारंभ निमित्त आयोजित या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने परिसरातील मान्यवरांचा, विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त व्यक्तींचा सत्कारही केला जाणार आहे. या संयुक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील (बापू), भोगावती कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अशोकराव पवार पाटील यांनी केले आहे.