पाऊस : राज्यात पुन्हा सक्रिय होणार

मुंबई :

काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या ( मुंबई ) प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

K S Hosalikar
@Hosalikar_KS
Severe weather warnings issued by IMD for Mah for 15-19 Aug, 2021.
As on day there is no warning for 19 Aug.
D1 parts of Konkan, Madhy Mah heavy rainfall at isol places.
D2-D4 heavy rainfall & TS warnings in diff districts as shown below.
Pl see IMD website for details.
2:40 PM · Aug 15, 2021
25
2
Copy link to Tweet

तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज….
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये मुसरळधार पावसाची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अति मुसरळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!