पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर सात फूट पुराचे पाणी,
चिखली आंबेवाडी गावाला बेटाचे स्वरूप
करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर रात्री 11 वाजता एक फूट पुराचे पाणी आले होते.सकाळी 11 वाजेपर्यंत रस्त्यावर
सुमारे सात फूट पुराचे पाणी आले आहे.करवीर तालुक्यात चिखली आंबेवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले असून,100 टक्के गाव स्थलांतर झाले आहे.आरे गावाला ही पुराचा धोका निर्माण झाला आहे.सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाल्याने संपर्क तुटला आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीचे
पुराचे पाणी रात्री रस्त्यावर आले,
जोरदार पाऊस पडल्याने तासाला किमान 1 फुटाणे उभे पाणी वाढत राहिले,आणि आता सकाळी 11 वाजता रस्त्यावर सुमारे 7 फूट पाणी आले आहे.2019 च्या महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गाव पातळीवर सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गाव निहाय पुराच्या पाण्यात गेलेली घरे अशी ,
नागदेववाडी 200,
शिंगणापूर, हणमंत वाडी 200,
वाकरे पोवरवाडी 110,बालिंगा 50,
साबळेवाडी 8,दोनवडे 27,
खुपीरे 2, शिंदेवाडी 36,
कुडीत्रे 65,पाडळी खुर्द 120,कोगे 20,
भामटे 8,सांगरुळ 12,
कोपार्डे 22.