कोल्हापुरात ओमायक्राँनचा संशयित रुग्ण
कोल्हापूर :
गेली काही दिवसात परदेशातून कोल्हापुरात आलेल्या रुग्णांचा शोध सुरू आहे. त्यातच आज कोल्हापुरातील रमणमळा येथे एक संशयित रुग्ण आढल्याने कोल्हापूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.
ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, ओमायक्रॉन च्या संशयित रुग्णामुळे म.न.पा. प्रशासनात खळबळ उडाली आहे.