एमबीए आणि एमसीए सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया आज पासून सुरू
Tim Global :
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमबीए आणि एमसीए सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया आज पासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ७ एप्रिलपर्यंत आहे.
सेलच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जनोंदणी आणि निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ७ एप्रिलपर्यंत मुदत असल्याची माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य सीईटी सेलमार्फत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिेकशन (एमसीए) या दोन्ही अभ्यासक्रमची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्यांदा सीईटी देणे अनिवार्य आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.