चिंताजनक : राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला
मुंबई :
राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे (First corona omicron virus patient in Maharashtra). या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्यानं या करोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा काळजी मध्ये आहे.
या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होता (Omicron in Kalyan Dombivali Mumbai). तो दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण आहे.