स्वयंभूवाडीची नागपंचमी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द : सरपंच सदाशिव बाटे
कोल्हापूर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंभूवाडीची उद्या 13 रोजी होणारी नागपंचमी यात्रा रद्द करण्यात आली, असून साध्या पद्धतीने विधीवत पूजा होईल, अशी माहिती सरपंच सदाशिव बाटे यांनी दिली आहे.
यावेळी सरपंच बाटे म्हणाले करवीर तालुक्यामध्ये बोलोली पैकी स्वयंभूवाडी येथे दरवर्षी नागपंचमी रोजी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंभूवाडीची नागपंचमी यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून साध्या पद्धतीने विधीवत पूजा होईल,अशी माहिती यावेळी देण्यात आली. यात्रा रद्द केली असून साध्या पद्धतीने विधिवत पूजा होणार आहे, तरी भाविकांनी गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे.
विधिवत पूजा सरपंच सदाशिव बाटे यांच्या हस्ते होणार आहे . यावेळी सदस्य दिगंबर भाटे, दीपाली मंडलिक ,शुभांगी गुरव ,पुजारी केरबा गुरव व पदाधिकारी उपस्थित होते.