Tim Global :
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमध्ये गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदे स्वतंत्रपणे भरण्यासाठी एकत्रित पदवी स्तर (CGL) परीक्षा २०२२ आयोजित करण्यासंबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या भरतीप्रक्रियेतून सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, लेखापरीक्षक, कर सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ती ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
पात्रता……
या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी किमान १८-२० वर्षे आणि कमाल ३०-३२ वर्षे असावे. त्याच वेळी, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार उच्च वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाईल.
भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवीधर असावा. तसेच, उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), पीडब्ल्यूबीडी, ईएसएम श्रेणीतील उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अर्ज…..
सर्वप्रथम ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर वेबसाईटवर नवीन New User? Register Now च्या लिंकवर क्लिक करा.
आता अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.
तुमची कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
एकदा सर्व तपशील तपासा आणि अर्ज सबमिट करा.
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे २० हजार उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर १२ ते १३ ऑक्टोबरपर्यंत त्यात दुरुस्ती करता येईल. टिअर १ परीक्षेची संभाव्य तारीख डिसेंबर २०२२ असेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकतात, त्याचप्रमाणे भरतीशी संबंधित अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.