नोकरीची साधा संधी : 650 पेक्षा जास्त रिक्त पदांद्वारे मोठी संधी
कोल्हापूर :
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 23 ते 25 ऑगस्ट रोजी ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन केले आहे. या ऑन लाईन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, विमा प्रतिनिधी, एचबीएम ऑपरेटर, टर्नर, मशिनिष्ट, फिटर इलेक्ट्रीक ऍ़न्ड मेकॅनिक, डिप्लोमा, बीई, डाटा प्रोसेसिंग असोशिएट, टेलीको-ऑर्डीनेटर,हेल्पर अशी 5 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, ,डिप्लोमा, बीई ,आयटीआय या शैक्षणिक पात्रतेची जिल्हयातील 8 आस्थापनांनी 650 पेक्षा जास्त रिक्त पदांद्वारे मोठी संधी देऊ केली आहे.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी.
उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे उद्योजकांकडून कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
इच्छुक युवक युवतींनी 24 ऑगस्टपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा न चुकता लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रं. 0231-2545677 वर संपर्क साधावा.