कुंभी कारखाना निवडणुकीसाठी नरके पॅनेल जाहीर, नवीन १४ चेहऱ्यांना संधी
कोल्हापूर :
कुंभी कासारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सत्ताधारी नरके गटाने नरके पॅनेल जाहीर केले .यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके ,कुंभी बँक अध्यक्ष अजित नरके उपस्थित होते. २३ उमेदवारांपैकी १४ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यामध्ये उत्पादक सभासद गट क्रमांक एक मध्ये अनिल पाटील वाकरे ,भगवंत पाटील वाकरे ,बाजीराव शेलार कुडित्रे, उत्पादक सभासद गट क्रमांक दोन राहुल खाडे सांगरुळ, उत्तम वरुटे कसबा बीड, किशोर पाटील शिरोली दुमाला ,दादासो लाड गणेशवाडी, सर्जेराव हुजरे महे, उत्पादक सभासद गट क्रमांक तीन संजय पाटील खुपिरे, सरदार पाटील पाडळी खुर्द, विश्वास पाटील कोगे, उत्पादक सभासद गट क्रमांक चार बळवंत पाटील यवलुज ,अनिश पाटील कसबा ठाणे ,प्रकाश पाटील तिरपण, उत्पादक सभासद गट क्रमांक पाच चंद्रदीप नरके बोरगाव, प्रकाश पाटील पाटपन्हाळा, वसंत आळवेकर तांदूळवाडी ,राऊ पाटील पनुत्रे, अनुसूचित जाती किंवा अनु जमाती कृष्णात कांबळे कोगे ,महिला सदस्य धनश्री पाटील आमशी, प्रमिला पाटील पडळ ,इतर मागासवर्गीय सदस्य विलास पाटील कोपार्डे, भटक्या मुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग युवराज शिंदे वरणगे यांचा समावेश आहे.
नरके पॅनेलचा प्रचार शुभारंभ ३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता महादेव मंदिर कसबा बीड येथे होणार आहे.