वैशाली शिंदे

कोल्हापूर ता.२२.

२००५ सालापासून तत्कालीन व विद्यमान चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून आपल्याला व सहकारी संचालकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याचा पायंडा गेली १६ वर्ष जपलेला आहे. त्यानुसार आज राज्‍याचे ग्रा‍मविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ,जिल्‍ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार राजेश पाटील, चेअरमन विश्‍वास पाटील व संचालक मंडळ यांना रक्षाबंधन निमित्त राजापूर ता.शिरोळ येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले, ता.कराड येथील श्रीमती वैशाली शिंदे यांच्याकडून गोकुळ प्रकल्प येथील कार्यलयात रक्षाबंधन पारपडले.

       यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती वैशाली शिंदे यांनी आज मला मुश्रीफ साहेब व बंटी साहेब यांच्‍या  रूपाने नविन जेष्‍ठ भाऊ  मिळाले आहेत. त्‍यांचे अशिर्वाद माझ्या सारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत.  गोकुळचा ऋणानुबंध जिवनात नवीन अशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण याज्न्मी न फिटणारे आहे. यामुळे मी माझ्या परिवाराचे पालन पोषण चागंल्या प्रकारे करू शकले याचे मला समाधान आहे. गोकुळ परिवारास माझ्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. आप्त –स्वकीयांच्या विश्वासघात केल्याने एडस सारख्या असाध्य रोगाची लागण झाल्यामुळे जीवन उध्वस्त झालेल्या वैशाली शिंदे या प्रबोधनच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृतीचे काम गेली १९ वर्ष अव्याहतपणे करत आहेत.गोकुळने माझ्या सारख्या अनेक महिलांना कठीण परिस्थितीत सहकार्य करण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची मदत केली असल्यामुळे आम्ही आमच्या वाट्याला आलेले खडतर आयुष्य सामान्य मनासासारखे जगत आहोत असे विचारही श्रीमती वैशाली शिंदे रक्षाबंधन निमित्त गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व त्यांच्या सहकाऱ्याना राखी बांधताना व्यक्त केले.                     

      राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी गोकुळ मार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी २००५ सालापासून आजतागायत म्हणजेच गेली १६ वर्षे गोकुळचे चेअरमन व त्यांच्या सहकारी संचालकांना राखी बांधून गोकुळचे व आपले ऋणानुबंध जपलेले आहेत.

यावेळी राज्‍याचे ग्रा‍मविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफसो,जिल्‍ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटीलसो, आमदार राजेश पाटील, चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!