नोकरी : भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी  जाणून घ्या माहिती

Tim Global :

भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी आहे. यासाठी भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सामान्य सेवेतील अधिकारी, नौदल निरीक्षक संवर्ग, हवाई वाहतूक नियंत्रक, निरीक्षक, पायलट, लॉजिस्टिक, शिक्षण आणि अभियांत्रिकी शाखेतील पदांसाठी भरती केली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार हे या पदांसाठी अर्ज करू शकतात, ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार या पदांसाठी १२ मार्च पर्यंत अर्ज भरू शकतात.

याशिवाय, उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/en/account या लिंकवर थेट क्लिक करून या पदांसाठी सहज अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701 या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना पाहू शकता. या भरती मोहिमेद्वारे एकूण १५५ पदे भरली जातील.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २५ फेब्रुवारी २०२२,

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ मार्च २०२२,

रिक्त पदे…..

एकूण पदे: – १५५,

सामान्य सेवा [GS(X)] जल संवर्ग – ४०,

नौदल निरीक्षक संवर्ग (NAIC) – ६,

हवाई वाहतूक नियंत्रक (ATC) – ६,

निरीक्षक – ८,

पायलट – १५,

लॉजिस्टिक – १८,

शिक्षण – १७,

अभियांत्रिकी शाखा(GS) – ४५,

शैक्षणिक पात्रता….
सामान्य सेवा [GS(X)] हायड्रो कॅडर या पदावर काम करण्यासाठी उमेदवार ६०% गुणांसह B.Tech उत्तीर्ण असावा.

नौदल निरीक्षक संवर्ग (NAIC) या पदासाठी उमेदवारांनी इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण केलेली असावी.

मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / उपकरणे आणि नियंत्रण / नियंत्रण अभियांत्रिकी / उत्पादन / औद्योगिक उत्पादन किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, उमेदवार हा इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं

निरीक्षक- BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं.

पायलट- BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं.

लॉजिस्टिक- उमेदवारांकडे B.Tech, MBA आणि B.Sc/B.Com/B.Sc IT पदवी असावी. तसेच ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेलं असावं.

अभियांत्रिकी शाखा (GS) – मेकॅनिकल/मेकॅनिकल, मरीन, इन्स्ट्रुमेंटेशन, उत्पादन, एरोनॉटिकल, औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, नियंत्रण अभियांत्रिकी, किमान ६०% गुणांसह तर ऑटोमेशनसह एरोस्पेस, ऑटोमोबाईल, धातुकर्म, मेकॅट्रॉनिक्स या सर्व पदासाठी उमेदवार हा BE/B.Tech in Instrumentation & Control या पदवीने उत्तीर्ण असावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!