कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक : इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी
कोल्हापूर :
276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना 19 हजार 307 मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.
विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.
विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.
उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-
अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
1 जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा) इंडियन नॅशनल काँग्रेस 97332
2 सत्यजीत (नाना) कदम भारतीय जनता पार्टी 78025
3 यशवंत कृष्णा शेळके नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड) 326
4 विजय शामराव केसरकर लोकराज्य जनता पार्टी 165
5 शाहीद शहाजान शेख वंचित बहुजन आघाडी 469
6 देसाई सुभाष वैजू अपक्ष 98
7 बाजीराव सदाशिव नाईक अपक्ष 66
8 भोसले भारत संभाजी अपक्ष 43
9 मनिषा मनोहर कारंडे अपक्ष 49
10 माने अरविंद भिवा अपक्ष 58
11 मुस्ताक अजीज मुल्ला अपक्ष 96
12 मुंडे करुणा धनंजय अपक्ष 134
13 राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक अपक्ष 114
14 राजेश सदाशिव कांबळे अपक्ष 111
15 संजय भिकाजी मागाडे अपक्ष 233
16 नोटा – 1799
17 रिजेक्टेड – 36