कोगे – बहिरेश्वर बंधाऱ्यासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर : आमदार पी.एन.पाटील
कोल्हापूर :
कोगे ते बहिरेश्वर दरम्यान
असलेल्या भोगावती नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या जीर्ण झालेल्या बंधाऱ्यासाठी एक कोटी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी दिली.
गेली कित्येक वर्षे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. त्यामुळे या मागणीची दखल घेत,
बंधाऱ्याच्या दुरुस्तीची गरज ओळखून आमदार पाटील यांनी निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. महत्त्वाचा असून या बंधाऱ्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी आ. पाटील यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे दिनांक १ जुन २०२१ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांना भेटून याबाबत चर्चा केली होती.
काल बुधवारी अचानक बंधाऱ्याच्या मधल्या पिलरचा स्लॅब कोसळला. तात्काळ या मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आली. त्यामुळे आमदार
पाटील यांनी अधिकाऱ्यांची आज गुरुवारी कोल्हापूर येथे बैठकीत घेऊन आमदार पाटील यांनी माहीती दिली.
यावेळी आमदार पी.एन.पाटील सडोलीकर म्हणाले, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी २० लाख निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच कामास सुरवात होणार आहे. या बंधाऱ्यावर जवळपास १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचे अंदाजे १८०० हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. तसेच वाहतुकीसाठी अत्यंत सोयीचा मार्ग आहे. या कामामुळे सर्वांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
आजच्या बैठकीत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते, शिवाजी कवठेकर, उपविभागीय अभियंता पी.जे.माने, कोगे शाखाधिकारी राकेशकुमार नाझरे, राधानगरी पाटबंधारे शाखाधिकारी समीर निरुखे आदी उपस्थित होते.