तोंडाला पाने पुसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू : बाळ पिंजरे : राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा हणमंतवाडी येथे प्रचार दौरा
कोल्हापूर :
कारखान्याच्या चेअरमननी हणमंतवाडी गावचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला. आमदारकीची व कारखाना निवडणूक जवळ आली की सत्ताधारी तोंडाला पाने पुसण्याचे काम करतात. आम्ही सर्व हणमंतवाडीकर गट तट विसरून शाहू पॅनेलला मताधिक्य देणारच. तोंडाला पाने पुसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू, असे प्रतिपादन बाळ पिंजरे यांनी केले.
राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या हणमंतवाडी येथील प्रचार दौरा सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी सरपंच संग्राम भापकर, सुरेश paat शिंगणापूर, नागदेववाडी, दोनवडे, चिंचवडे, वरणगे, पाडळी बुद्रुक ,निटवडे या ठिकाणी प्रचार दौरा झाला.माजी सरपंच व यशवंत बँकेचे संचालक संग्राम भावपकर, सुरेश रांगोळकर, अमित पाटील, महादेव शिंदे यांनी राजर्षी शाहू आघाडिला मताधिक्य देण्याचा एकत्रित निर्धार व्यक्त केला.
अमर पाटील शिंगणापूर म्हणाले, राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेल हे खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने जाणारे पॅनेल आहे. माजी शिक्षण सभापती रसिका पाटील यांच्या माध्यमातून शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी परिसरात विकासकामाला मोठा निधी दिला आहे. येथील जनतेचे मोठे सहकार्य लाभले आहे. येत्या कुंभी कारखाना निवडणुकीत सर्वांनी मोठे मताधिक्य आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पारड्यात टाकावे असे आवाहन केले.
यावेळी ऍड प्रकाश देसाई यांनीही यावेळी जोरदार टीका करत सत्ताधारी आमच्या एकीने बिथरले असल्याचे सांगून कुंभीवरील हा ढिसाळ कारभार घालवून देऊ असे आवाहन केले.
भाषण केले. राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.