शेतकऱ्यांनी धान व नाचणी विक्रीकरिता 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करावी

कोल्हापूर :

ज्या शेतक-यांनी हंगाम 2021-22 मध्ये धान (भात) व नाचणी पिकाची रब्बी हंगामात लागवड केली आहे. तशी सातबा-यावर ऑनलाईन रब्बी लागवडीची नोंद आहे व त्यांना त्यांचा माल हमीभाव केंद्रावर विक्री करायचा आहे, अशा शेतक-यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 पूर्वी विक्रीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.

पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान व नाचणी खरेदीकरिता शेतक-यांची एन. ई. एम. एल. पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान (भात) खरेदीसाठी दिनांक 1 मे ते दि. 30 जून 2022 असा कालावधी ठेवण्यात आला असून नाचणी खरेदीसाठी स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहे.            

                         
सर्व अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेल्या कालावधीत हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये उत्पादीत केलेला धान व नाचणी विक्रीसाठी नोंदणी करीता शेतक-यांनी आधारकार्ड, वोटींग कार्ड, शेतीचा रब्बी हंगाम 2021-22 मधील रब्बी कालावधीतील धान व नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा 7/12, 8-अ व बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह पुढील संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करावी.

आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ लि; आजरा.
चंदगड ता. शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. तुर्केवाडी, ता. चंदगड,
चंदगड ता. कृषिमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्या, अडकूर, ता. चंदगड,
राधानगरी तालुका जोतिर्लिंग भाजीपाला व फळे सह खरेदी विक्री संघ लि; पणोरी,
ता. राधानगरी,
राधानगरी तालुका शेतकरी सह. संघ लि. सरवडे, ता. राधानगरी,
  राधानगरी तालुका शेतकरी सह. संघ लि. सरवडे, ता. राधानगरी, 
  भुदरगड ता. शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि. गारगोटी, ता. भुदरगड,
  कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि उद्योग खरेदी विक्री संघ मर्या. बामणी, ता. कागल
  दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप मार्केटिंग फेडरेशन लि; गोकुळ शिरगांव, कोल्हापूर  
              अधिक माहितीकरिता कृषि उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, श्री शाहू मार्केट यार्ड, कांदा बटाटा लाईन, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!