करवीर पंचायत समिती सभापतीपदी मंगल पाटील बिनविरोध
करवीर :
करवीर पंचायत समिती सभापती पदी पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मंगल आनंदराव पाटील ,नेर्ली यांची बिनविरोध निवड झाली .निवडणूक अधिकारी तहसीलदार शीतल मुळे- भामरे होत्या. यावेळी गटविकास अधिकारी जयंत उगले उपसभापती अविनाश पाटील,सर्व सदस्य उपस्थित होते.
राजर्षी शाहू सभागृहात सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली. मंगल पाटील यांचे नाव माजी उपसभापती सुनील पवार यांनी सुचवले. मावळत्या सभापती मनिक्षी पाटील यांनी अनुमोदन दिले. पाटील यांच्या समर्थकांनी पंचायत आवारात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष शशिकांत खोत,सदस्य प्रदीप झांबरे, राजेंद्र सूर्यवंशी, विजय भोसले, मीनाक्षी पाटील, इंद्रजित पाटील, रमेश चौगुले, उप सभापती अविनाश पाटील, सुनील पोवार यांनी अभिनंदन व मनोगत व्यक्त केले.
निवडीनंतर बोलताना नूतन सभापती पाटील म्हणाल्या, महापुराच्या कामात सर्वच सदस्यांचे सहकार्य राहील, सर्वांना विश्वासात घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली.