निर्बंध जैसे थे : पुढील आदेश लागू होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे
कोल्हापूर :
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या स्तर – 4 चे निर्बधास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच यापूर्वी जिल्ह्यासाठी जे निर्बंध होते ते कायम आहेत, संपूर्ण जिल्हयात स्तर – 4 चे निर्बध पुढील आदेश होईपर्यत लागू राहतील असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले .
कोविड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असताना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बधाबरोबरच खालील नमुद विशेष उपाययोजनेबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी निर्गमित केले आहेत.
लसीकरणाबाबत सार्वजनिक जनजागृती करणे, लसीकरणास पात्र लोकसंख्येच्या जास्तीत जास्त 70 टक्के पर्यंत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे. कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांचे (ब्लू कॉलर कामगार) लसीकरण करणे व त्यांना लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहीत करणे. कोविड-19 विषाणू संसर्ग रोखणेसाठी चाचणी/शोध/उपचार या पध्दतीचा प्रभावी वापर. कामाच्या ठिकाणी कोविड-19 विषाणू प्रतिबंध उपाययोजना करत असताना सुरक्षित कामाच्या जागा निश्चित करून संबंधित आस्थापनांनी योग्य वायु विजन योजना करावी.
मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात याव्यात आणि यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागास अभिप्रेत असलेली आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी वाढविण्यात यावी. कोविड-19च्या नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असे कार्यक्रम / उपक्रम / परिषदा / मेळावे घेण्यात येवू नयेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रे शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियमानुसार निश्चित करावीत, जेणेकरुन लहानातलहान क्षेत्रामध्ये तसेच संसर्गीत क्षेत्रामध्ये निर्बंध लादणे सोईचे होईल. कोविड-19 योग्य वर्तणूकीचे पालन केले जाईल याची पाहणी करणेसाठी भरारी पथके नेमणेत यावीत. त्यांच्या मार्फत विशेषत: लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. कोव्हीड -19 बाबत योग्य वर्तणूकीचे पालन न करणाऱ्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात यावी.
State Level Trigger अंतर्गत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील पुढील आदेशा नुसार निर्बधाचे स्तर ठरविण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात येईल. जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेली पॉझिटीव्ह पेशंटच्या संख्येनुसार ठरविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्याडून प्रसिध्द केली जाणारी आकडेवारी आणि State Level Trigger अंतर्गत देण्यात आलेले आदेशनुसार निर्बधाचे स्तर निश्चित करण्यात येईल. निर्बंधाचा स्तर कमी करत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हयातील मागील दोन आठवडयाची कोविड संसर्गित रुग्णांच्या संख्येचा कल विचारात घेवून निर्णय घेण्यात येईल. निर्बंध पातळीवर काही बदल झाल्यास पुढील सोमवार पासून सुधारीत निर्बंध अंमलात येतील
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.