सेवानिवृत्त सेवा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मछिंद्र कांबळे यांची निवड
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी मछिंद्र कांबळे (शिरोली दुमाला ता. करवीर) तर कार्याध्यक्षपदी रंगराव वाडकर यांची निवड संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष विनायक घटे होते.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना विनायक घटे म्हणाले, संघटनेने राज्य स्तरावर जिल्हा परिषद सेवानिवृत्तांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शासन पातळीवर सातत्याने आवाज उठवला असून निवडश्रेणी लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक जादा वेतनवाढ देणे, पेन्शन आदालत घेणे, जात पडताळणीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुटका करणे, सेवानिवृत्तांच्या मतिमंद मुलांना पालकाच्या पश्चात पेन्शन योजना लागू करणे इ. मागण्या शासनाकडून मंजूर करून घेतल्या आहेत. तसेच दरमहाचे निवृत्तीवेतन वेळेवर मिळणेबाबत. शासनाकडे पाठपुरावा करून सेवानिवृत्तांना न्याय मिळवून दिला आहे.
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सिताराम शिंदे म्हणाले, सेवानिवृत्ती नंतर उतरत्या वयात कर्मचा-याना आरोग्यासह अनेक समस्याना सामोरे जावे लागते. सेवानिवृत्त कर्मचा-याचा उत्तरार्धात कोणतीही आर्थिक समस्या राहणार नाही यासाठी सेवासमिती सन २००८ पासून तालुका, जिल्हा व राज्य स्तयावर कार्यरत असून सर्व जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचा-यानी या संघटनेचे सभासद व्हावे असे आवाहन केले.
बैठकीला पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सेवा समितीचे कार्याध्यक्ष सिताराम शिदे, राज्य सरचिटणीस चंद्रकात मांडवकर, सुहास बसनकर, जयरत्न कदम, दत्तात्रय बामणे, आर एस पाटीर, एस के पाटील, शंकर पवार, पी आर पाटील, प्रमिला माने, शहाजी एकशिगे, नागनाथ सन्नके, तानाजी देसाई, बी एस पाटील, सुनिता करपे, महिराज जमादार, एकनाथ सामंत, दिलीप लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत श्रीकात टिपुगडे, प्रास्ताविक चंद्रकांत मांडवकर तर आभार सुहास बसनकर यांनी म्हणाले.
————–
कोल्हापूर जिल्हा नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
जिल्हाध्यक्ष- मछिंद्र कांबळे,कार्याध्यक्ष -रंगराव वाडकर सरचिटणीस – विश्वनाथ कांबळे, कोषध्यक्ष- आनंदराव जाधव,उपाध्यक्ष – नंदकुमार जाधव,सहसचिव- रफिक काझी, संघटक- रंगराव गडकर,महिला प्रतिनिधी- अनुजा देसाई, शोभा गायकवाड.
————– ————– ————– ————–