उद्योजक तेज घाटगे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड
कोल्हापूर :
युवा उद्योजक व माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. निवडीनंतर तेज घाटगे यांनी खासदार शाहू छत्रपती महाराज यांची आभारपर भेट घेतली. यावेळी शाहू छत्रपती महाराजांनी तेज घाटगे यांचा निवडीनिमित्त सत्कार केला.
कोल्हापूर लमधील उद्योज व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्रात तेज घाटगे कार्यरत आहेत. अनेक सामाजिक कार्यक्रमातही अग्रेसर असतात. विमानतळ सल्लागार समिती सदस्य म्हणून निवडी झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून घाटगे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.