दत्तात्रय मेडसिंगे यांची भाजपच्या करवीर तालुका अध्यक्षपदी निवड
करवीर :
भोगावती साखर कारखान्याचे संचालक
कांडगाव (ता. करवीर) येथील दत्तात्रय बाळासाहेब मेडसिंगे यांची भारतीय जनता पक्षाच्या करवीर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजित घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, हंबीरराव पाटील, हिंदूराव शेळके यांचे सहकार्य लाभले. निवडीनंतर मेडसिंगे यांचे अभिनंदन होत आहे.
दत्तात्रय मेडसिंगे हे भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. कांडगाव येथे लोकराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे कार्य करत आहेत.

निवडीच्या निमित्ताने, करवीर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत नेणार, भाजपचा विस्तार करण्याचा, शासकीय योजना जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .