राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची निवड
कोल्हापूरः
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) आढावा बैठक मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. यावेळी युवक काँग्रेस प्रदेशची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावचे अभिषेक अरुण डोंगळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अभिषेक डोंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षात कार्यरत असून त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदावर सक्रिय काम केले आहे. त्यांनी पक्ष वाढीकरिता केलेले काम व पक्षावरील निष्ठा बघता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्याचे काम पाहून यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदावरून श्री.डोंगळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी बढती देण्यात आली.
दरम्यान, यावेळी डोंगळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यात येईल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सक्रीय सहभाग असेल असे प्रतिपादन केले. तर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी डोंगळे यांना नियुक्तीबद्दल अभिनंदन करून राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.