करवीर :
बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुर मधुकर जांभळे,उपसरपंचपदी पंकज कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून बांधकाम विभाग शाखा अभियंता व्ही,के, पाटील,यावेळी तलाठी किरण पाटील, ग्रामसेवक आर आर भगत, उपस्थित होते.

सदस्य असे
सचिन माळी,पौर्णिमा जत्राटे, धनजय ढेंगे,विद्या माळी,सुधाताई वाडकर,राखी भवड,नंदकुमार जांभळे,पूजा जांभळे,संदीप सुतार,बिनविरोध सुनीता जांभळे,वैशाली कांबळे.
निवडीनंतर सरपंच मयूर जांभळे यांनी, बिनविरोध सरपंच निवडीसाठी सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य मिळाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीतजास्त निधी आणून विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, अनिल पवार ,श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे ,विश्वास जांभळे ,भीमराव कांबळे, अजय भवड, कृष्णात माळी, पांडुरंग वाडकर,नंदू जांभळे, कार्यकर्ते,व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जांभळे गटाने जेसीबीने गुलालाची उधळण केली. फटाक्यांची आतिषबाजी केली.