युवराज पाटील यांची करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर अध्यक्ष पदी निवड
करवीर :
कुडीत्रे (ता. करवीर) येथील युवराज संभाजी पाटील यांची करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांना निवड पत्र देण्यात आले.
निवडीसाठी राष्ट्रवादी पदवीधर संघ प्रदेशाध्यक्ष सुनिल पाटील, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलदादा साळोखे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघ जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांचे सहकार्य लाभले.