सेवा सहकारी संस्थेमध्ये काम करण्यास इच्छुकांनी 11 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करा

कोल्हापूर :

सेवा सहकारी संस्थेमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव 11 फेब्रुवारी 2022 पर्यात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

काम देणा-या आस्थापनेचे नाव, कामाचे स्वरूप, संख्या, कालावधी व मानधन/वेतन, कालावधी 11 महिन्यासाठी याप्रमाणे-
औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुर्केवाडी ता.चंदगड जि.कोल्हापूर- सफाई कामगार- 01, वेतन रुपये 493 प्रतिदिन.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडहिंग्लज जि.कोल्हापूर- सफाई कामगार- 01, वेतन रुपये 493 रु. प्रतिदिन.
उपकार्यकारी अभियंता, दुधगंगा कालवे विभाग क्र.1 कोल्हापूर- वाहन चालक- 02, वेतन रुपये 13 हजार 330 रु. प्रतिमहा प्रत्येकी.
जिल्हा शल्य चिकीत्सक, रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, सी.पी.आर.कोल्हापूर- सफाई कामगार- 01, वेतन रुपये 6 हजार 250 रु. प्रतिमहा याप्रमाणे राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!