शेतकरी  संघाचे उपाध्यक्ष  बाबासाहेब  पाटील-भुयेकर यांचे  निधन

कोल्हापूर :

शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब ज्ञानू पाटील-भुयेकर यांचे शनिवारी (ता.१२ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षाचे होते. करवीर पंचायत समिती व बाजार समितीचे सभापतिपद त्यांनी भूषविले होते. सलग तेरा वर्षे ते करवीर पंचायत समितीचे सभापती होते.

बाबासाहेब पाटील हे भुये गावचे. माजी कृषिराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले अशा भावना उमटत आहेत. समाजातील विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दसरा चौक येथील श्री शाहू शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षदी ते कार्यरत होते. कोल्हापुरातील विविध चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी, १९७७ मध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

इरिगेशन फेडरेशन, टोलमुक्ती चळवळ, खंडपीठ आंदोलन, रस्ते प्रकल्प अशा आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकरी संघात ते अनेक वर्षे संचालक होते. बाजार समिती सभापती म्हणून काम केले होते. १९७७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व केले होते.

अल्पशा आजाराने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कसबा बावडा परिसरातील कारंडे मळा येथील निवासस्थानी निधन झाले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी भुयेकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले भारत व उत्तम, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!