करवीर :
वृक्षवल्ली सामाजिक संस्थेच्या वतीने व
वैष्णवी हॉटेलचे मालक संदीप यशवंत पाटील यांच्या पुुढाकाराने करवीर तालुक्यातील नंदवाळ विद्यामंदिर शाळेतील गरीब, अनाथ, होतकरू मुलांना दर्जेदार पद्धतीच्या स्कूल बॅग, युनिफॉर्म, रेनकोट व शैक्षणिक साहित्य देऊन मदत करण्यात आली.
वृक्षवल्ली सामाजिक संस्थेच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंदवाळ शाळेचे मुख्याध्यापक रंगराव गडकर यांनी
सामाजिक बांधिलकी जोपासत संस्थेने
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस जे प्रोत्साहन दिले यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावेल व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी दिलीप पाटील, शंकर गोसावी, संदीप मगदूम नितीन गुरव, वैशाली राव, वृषाली पाटील , सलमा मकानदार, अश्विनी यादव आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.