निवडणूक : विधान परिषदेसाठी दहा डिसेंबरला मतदान
कोल्हापूर :
राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी दहा डिसेंबरला मतदान होत आहे.चौदा डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.नुकताच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
मुंबईतील दोन जागासह कोल्हापूर, धुळे, नागपूर,अकोला विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. कोल्हापुरात गॄहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या साठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे.