नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले
कोल्हापूर :
कोल्हापुरातील साडेतीन शक्ति पीठापैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवास उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उत्सवाची तयारी झाली असून मंदिर आकर्षक रोषणाई मुळे उजळून निघाले आहे.
करोनामुळे गतवर्षी मंदिर बंद होते. यंदा करोना नियमांचे पालन करीत मंदिर खुले होणार असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवात,सकाळी मंदिरामध्ये तोफेची सलामी दिली जाईल. त्यानंतर गाभाऱ्यामध्ये घटस्थापना विधी होणार असून, दुपारनंतर विशेष पूजा बांधली जाणार आहे. रात्री देवीचा पालखी सोहळा मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अंबाबाईचे श्रीपूजक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या सर्वांचीच उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे, पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.