बोलोलीचे प्रतिष्ठित व्यतिमत्व राणे मामा यांचे निधन
करवीर :
करवीरच्या पश्चिम भागातील बोलोली व बारा वाड्यांतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेले बोलोली गावचे महादेव दत्तू राणे यांचे आज वयाच्या ८५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘ राणे मामा ‘ म्हणूनच ते बोलोली व परिसरात ओळखले जायचे.
राणे मामा हे माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रेदादा यांचे सच्चे व विश्वासू कार्यकर्ते होते. त्यानंतर आमदार पी.एन. पाटील यांचेही ते सच्चे कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचेही ते विश्वासू सहकारी राहिले आहेत. स्व. बोंद्रेदादा यांचेकडून बोलोली व बारा वाड्यांसाठी पिण्याच्या व शेती कामासाठी उपयुक्त उपवडे तलाव मंजूर करून घेण्यात परिसरातील अन्य सहकारी मंडळीसोबत पुढाकार घेतला होता. अनेक सामाजिक कार्यातही ते पुढे होते.
गावातील हनुमान दूध संस्थेचे ते माजी चेअरमन होते. तर महादेव दूध संस्थेचे संस्थापक होते. राणे मामा यांचे ४५ सदस्यांचे एकत्र कुटुंब आहे. कुटूंबातील सर्वजण त्यांना आदराने बाबा म्हणायचे. मात्र बोलोली व परिसरात ते राणे मामा म्हणूनच परिचित होते. रक्षाविसर्जन शुक्रवारी दि. २७ रोजी सकाळी आहे.