करवीर :
करवीर तालुक्यात आज सायंकाळी मुसळधार पाऊस बरसला .
रात्री साडेआठ नंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह कुंभी कासारी परिसरात वादळी वाऱ्याने सुरुवात केली अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांची व येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसापासून करवीर तालुक्यात सकाळी ढगाळ वातावरण दुपारनंतर उन्हाचा तडाखा व रात्री पुन्हा आकाशात ढग जमून येत होते. पण पावसाने हुलकावणी दिली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पुन्हा उन्हाच्या तडाख्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. सायंकाळी सातपर्यंत आकाश निरभ्र होते.
पण सात नंतर आकाशात ढग जमू लागले रात्री आठच्या दरम्यान करवीर तालुक्यातील अनेक गावात सोसाट्याचा सह तुरळक पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली साडेआठ नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली दरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला अचानक आलेल्या पावसाने लोकांची मोठी तारांबळ उडालेली दिसत होती.